जाणीव
- डॉ. मुकुल स. गोडबोले (c)
मनुष्य प्राण्याला सतत जाणीव करून द्यावी लागते. उदारहण, वेळेचं भान ठेवण्यासाठी मनगटी घड्याळ बांधावं लागतं. स्पष्ट दिसावं यासाठी डोळ्याला चष्मा लावावा लागतो. अनादी काळापासून (11 व्या शतकापासून) माणूस (मुख्यतः पुरुष) जानवं घालत आला आहे. जानवं हे एक प्रकारे वस्त्रच मानलं गेलं आहे. मध्यंतरी जानवं केवळ ब्राह्मण घालू लागले, इतर वर्णांनी त्याचा वापर कमी केला. पण मुळातच, जानवं घालावं तरी कशाला? ते लहान वयातच का घालायला सुरुवात करायची? आणि ते खांद्यावरून कमरेकडे वं परत खांद्याकडे का घालावे? नुसतं मनगटी, किंवा गळ्याभोवती, किंवा कमरेभोवती का गुंडाळू नये? हे प्रश्न मनात सतत येत असत. त्याची म्हणावी तशी उत्तरं कधी मिळाली नाही. पण एके दिवशी 'जाणीव' झाली! माझ्या मते जानवं हे माणसाला जाणीव करून देण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारेच परिधान करणे आवश्यक आहे. आणि जानवं व जात/पंथ/लिंग/वर्ण यांचा काहीच संबंध नाही. कारण जाणीव हि प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेची असते! मनुष्य शरीर हे पृथ्वीवरील पंच महाभुतांपासून बनलं आहे, व जे ब्रह्मांडात आहे ते शरीरात आहे असे मानले जाते. मनुष्य प्राण्याचं अस्तित्व हे पृथ्वीच्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. त्यामुळे मनुष्य शरीर हे एका लोहचुंबक आहे. ज्याला उत्तर (मेंदू) व दक्षिण (पाय) बाजू आहेत. म्हणून दक्षिणेकडे पाय करून झोपू नये असे लहानपणापासून सांगितले जाते. पृथ्वी हि २३.४ अक्षांश झुकलेली आहे; ज्यामुळे जीव-सृष्टी जन्मू व तग धरू शकली आहे. इतर ग्रहांप्रमाणे जरा जरी हा कोन बदल केला, तर जीव-सृष्टी संपेल. आता याचा जानव्याशी काय संबंध? खूप जवळचा संबंध आहे! जानवं हे खांद्यावरून परिधान केल्यास मुख्य शरीरापासून (मध्य रेषा) २३.४ इतका कोन तयार होतो, जो पृथ्वीच्या अक्षांशाशी मेळ खातो. शरीराच्या उत्तर व दक्षिण ध्रुवाला छेद देत जानवं परत कमरेकडून खांद्यावर येतं. एक पूर्ण चक्र! जणू पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा. आपलं शरीर हे पृथ्वी सम आहे याची जाणीव करून देण्याचं काम जानवं करतं! ३६५ दिवसात किमान एकदातरी जानवं बदलावं, जसं ऋतु पालट होतो, तसं! लहानवयात मुंज/उपनयन संस्कार करून शरीराची/पृथ्वीची सूर्याशी बांधिलकी जोडली जाते. नाहीतर जानवं हे सूर्याला अर्पण करूनच परिधान करायची पद्धत उगाच का पडली असेल? त्याला हेच एक कारण मला तरी योग्य वाटते. तर अशाप्रकारे जानवं हे प्रत्येक स्त्री-पुरुषाने परिधान करून स्वतःची पृथ्वी व सूर्याशी नाळ जोडून घ्यावी. जेणेकरून ब्रह्मांडाशी एकरूप होता येईल.
Comments
Post a Comment