Skip to main content

पाणी

 

पाणी

डॉ. मुकुल . गोडबोले

तू कधी आकाशात सुंदर मेघांच्या रुपात,

तर कधी त्याच पावसात भिजलेल्या भिंतीतून झिरपणाऱ्या थेंबात!

तू कधी हळुवार वाहणार्‍या नदीत,

तर कधी आक्रांत ओरडत तांडव करणाऱ्या महा-प्रवाहात!

तू कधी भूगोलाच्या अभ्यासक्रमातल्या ९७ टक्क्यात,

तर कधी तुझा फक्त भासच व्हावा अशा रण-रणत्या उन्हात!

तू कधी टपरीवर गरम उकळणाऱ्या चहात,

तर कधी किनाऱ्या समोरच्या अथांग महासागरात!

तू कधी प्रेयसीच्या खोडकर शिंतोड्यात,

तर कधी घायाळ प्रियकराच्या ग्लासात!

तू कधी अपमानित आणि उपेक्षिताच्या अश्रूत,

तर कधी काबाड कष्ट करणाऱ्या कामगाराच्या घामात!

तू कधी पोलिओ ला नेस्तनाबूत करणाऱ्या ठीबक्यात,

तर कधी जीवन-मरणाच्या वेशीवर टांगलेल्या सलाईनच्या थेंबात!

तू श्रीमंताच्या दारूच्या प्याल्यात,

तर कधी तहानलेल्या गरीबाच्या पाण-पोयात!

तू कधी "अहो! ऐकलात का? पाणी तापलय!" च्या हाकेत,

तर कधी "अहो! कुठे आहात? पाणी संपलं आहे!" च्या ओर्ड्यात!

तू कधी केमिस्त्रीच्या प्रयोगशाळेत सॉल्व्हन्टच्या रुपात,

तर कधी जीवशास्त्राच्या प्रयोगशाळेत प्रत्येक जिवंत पेशीत!

तू कधी छान संध्याकाळच्या निवांत गारव्यात,

तर कधी लोड-शेडींग मुळे बंद पडलेल्या .सी/कुलरच्या थंडाव्यात!

तू कधी पाईप घेऊन मोटार-गाडी धुणाऱ्याच्या नासाडीत,

तर कधी सायकल पुसणाऱ्या लहानग्याच्या ओल्या कापडात!

तू कधी विजयी मुलासाठी ओघळणाऱ्या आनंद-अश्रूत,

तर कधी व्यसनाधीन कार्ट्याच्या वडिलांच्या पाणावलेल्या डोळ्यात!

तू श्वासात, तू ध्यासात, तू घासात...

तू भांड्यात, तू भांडणात

तू सर्वात, सर्व तुझ्यात!

तू जीवनाची सुरुवात, तूच जीवनाच्या अंतिम-क्षणात!

अरे पाण्या, तुझा विसर नं व्हावा

तू सभोवतालीअसून सुद्धा तुझा तुटवडा नं व्हावा!

Comments

Popular posts from this blog

तुझा, मुकुल

  तुझा , मुकुल - डॉ. मुकुल स. गोडबोले   वाळलेला दाणा , मज पेरले तुझ्या कुशी लाभले पाणी , रवी , हवा , तुझी छाया नि माया , धरती माता काळ जरा उलटला , नि कोंब मज फुटला जन्मलो नि वाढलो , तू माझी आभाळमाया आईच्या कुशीत खेळण्यात मग कसला आलाय झगडा ? तुझ्या गर्भातून डोकावता नमन तुज करितो माता वाढ होण्यास माझी मुळं रोवली तुझ्यात कधीही नं कुरकुरता , ती तू सामावली स्वतःत सामर्थ्य माझे मज , अवगत तू केले गर्भसंस्कार उत्तम झाले , तुझ्या हातभारे , मला गोंडस रूप आले मुकुल ते वृक्ष वाढलो तुझ्यामुळे पानं , फुलं , बिया वाहतो तुज हर ऋतूत , त्याचेही तू करसी चीज , जन्म देऊनी नवीन मुकुल आपुले नाते इतके घट्ट धरून ठेविसी एकसंघ उन्मळून जरी पडलो परी तुझ्यात परत सामावलो सांभाळ ग आई मज मी बाळ तुझ्या   कुशीत   आलो  

"हाडांच्या आरोग्याचे मूल्यमापन" - एक समालोचन !

 "हाडांच्या आरोग्याचे मूल्यमापन" - एक समालोचन ! हाडांचे आजार व दुखणी फक्त वयाशी जोडली जातात. पण असे विकार हे जनुकीय, अपघात, अयोग्य वापर, दुर्लक्ष करणे, आदी कारणांमुळे देखील उद्भवतात. हाडांचे आजार वेळीच ओळखले गेले तर त्यावर उपचार घेऊन ते बरे देखील होऊ शकतात. काही विशिष्ट उपकरणं वापरून हाडांचे विकार किंवा तसे घडण्याची शरीराची प्रवृत्ती ओळखता येते. अशी उपकरणं रुग्णालयं व आरोग्य केंद्रांमध्ये जरी उपलब्ध असली, तरी त्यांच्या मदतीने चिकित्सा करून घेणे हे सर्वसामान्यांसाठी शक्य होत नाही. आधुनिक काळात नवनवीन उपकरणं येत राहिली. पण तरी, अचूक व किफायतीशीर निदान करणारी उपकरणे अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडील आहेत. रक्त-लघवी चाचणी करून हाडाचे विकार शोधणारी प्रणाली विकसित आहे, पण त्यात नेमके कोणते घटक शोधावेत व त्याचे विवेचन कसे करावे यांवर संशोधन चालू आहे. पण, या सगळ्या विषयांची एकत्रित माहिती, साध्या भाषेत, उपलब्द होत नाही व सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही.  नुकतेच, डॉ. अमृता नाईक यांनी या विषयांचे "बायोमटेरियल्स ऍडव्हान्ससेस" या आंतरराष्ट्रीय नियतकालीकेत (एल्सवियर प्रकाश...

आंब्याचे झाड!

  आंब्याचे झाड! - डॉ. मुकुल स. गोडबोले कोईतून जन्म घ्यावे, धरणीमातेचा हातभार, वृक्ष असावे आंब्याचे, कल्पतरू, सर्वांना आधार! पाना-फांद्यांचा पसारा, देई सावली व थंड वारा, वाटसरू वा गाय-वासरू, विसावी छायेत आईच्या! सणा-सुदीला तोरण, हिरवी आंब्याची पानं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, पानांचा डौल सदाबहार! वर्षभर चाले कारभार, वसंत ऋतूत येई बहार, मोहोर, कैरी, आंबा, उल्हासित होई उन्हाळा! आंबट, पण उत्साहवर्धक, कैरी ची मजाच न्यारी, लोणचे, पन्हे, साखरंबा, बरणीत वर्षभर टिकवा! फळ आंब्याची थोरवी पहा, अल्लड युवराज होई राजा, केसरी, सुवासीन, चवदार, बागायतदारांना काळजी फार! सीझनचा पहिला आंबा, किंवा दर उतरेस तोवर थांबा, आमरस, चिरून, वा आइस्क्रीम खा, आंबा नं आवडे? डोके तपासा! हापूस, पायरी, तोतापुरी, ३०० हून अधिक जाती, आंबा कोकणचा वा मलीहाबाद, महती पोचली अटकेपार! कलम करून एकाच झाडावर, कैक जातीचे आंबे उगवा, एक असो वा अनेक, फळाच्या चवीत गोडवा! कलमी आंबा दुसर्‍या जातीचा, तरी झाड ना करे हाल-अपेष्टा, स्वतःचे कायदे नियम ना लादी, आंबा राखी मूळ गुण व जाती! पोटची कोय अर्पूनी, फेडतो मातीचे देणे, धडे घ्यावे माणसाने, कि...