पंख - डॉ. मुकुल स. गोडबोले पंख फुटले तुज पण उडता ही येईना घाई झाली, तुज तोल सावरेना नाविन्याची आवड एरवी मिळेना सवड कडा पहारा असे घरच्यांचा तुजवर आता कुठेशी आलास बाहेर केले अविचारी सीमोल्लंघन कोणी नाही आसपास नाही म्हणण्या तुज तुज बंधन घालण्याची इच्छा नाही मज पंखांची ताकद समज नि मग हो स्वैर