Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

पाणी

  पाणी – डॉ . मुकुल स . गोडबोले तू कधी आकाशात सुंदर मेघांच्या रुपात , तर कधी त्याच पावसात भिजलेल्या भिंतीतून झिरपणाऱ्या थेंबात! तू कधी हळुवार वाहणार्‍या नदीत , तर कधी आक्रांत ओरडत तांडव करणाऱ्या महा - प्रवाहात ! तू कधी भूगोलाच्या अभ्यासक्रमातल्या ९७ टक्क्यात , तर कधी तुझा फक्त भासच व्हावा अशा रण-रणत्या उन्हात! तू कधी टपरीवर गरम उकळणाऱ्या चहात , तर कधी किनाऱ्या समोरच्या अथांग महासागरात! तू कधी प्रेयसीच्या खोडकर शिंतोड्यात , तर कधी घायाळ प्रियकराच्या ग्लासात ! तू कधी अपमानित आणि उपेक्षिताच्या अश्रूत , तर कधी काबाड कष्ट करणाऱ्या कामगाराच्या घामात ! तू कधी पोलिओ ला नेस्तनाबूत करणाऱ्या ठीबक्यात , तर कधी जीवन-मरणाच्या वेशीवर टांगलेल्या सलाईन च्या थेंबात ! तू श्रीमंताच्या दारूच्या प्याल्यात , तर कधी तहानलेल्या गरीबाच्या पाण-पोयात! तू कधी "अहो! ऐकलात का? पाणी तापलय!" च्या हाकेत , तर कधी "अहो! कुठे आहात? पाणी संपलं आहे!" च्या ओर्ड्यात! तू कधी केमिस्त्री च्या प्रयोगशाळेत सॉल्व्हन्ट च्या रुपात , तर कधी जीवशास्त्राच्या प्रयोगशा...